Friday, April 11, 2014

नुकताच गुढीपाडवा साजरा झाला . चैत्र प्रतिपदा या आपल्या शक गणने नुसार एक वर्ष संपून दुसरे वर्ष सुरु झाले.फोन ,SMS, whatsapp सगळीकडून शुभेच्छांचा पाऊस पडला. समृद्धीचं, मांगल्याचं प्रतिक किंवा अमुक एक प्रसंगाची आठवण म्हणून ,असे गोड गोड शब्दांचे मुखवटे चढवून काहीबाही सजवून उभं करायचं आणि त्याची पूजा करायची!होळी, धुळवड,रामनवमी, हनुमान जयंती , चैत्रगौरी अशी  असंख्य प्रतिके आपण अगदी सोपस्कारासारखी पुजत आहोत. आपल्या समाजात सध्या नुसता प्रतीकांचा सुळ्सुळाट माजला आहे असे वाटते .मुळात या सर्व गोष्टींमागे काही चांगले विचार आहेत.पण आपण त्याच्या भौतिक स्वरुपात इतके हरवून जातो कि त्यामागची भावना पूर्णपणे विसरली जाते. मग एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या कि,
हे हि वर्ष आपले डोळे कोणी उघडू शकले नाही! 
यावर्षी सुद्धा आपण लाचारी, गरिबी,अज्ञान, दुष्काळ दूर करण्यासाठी काहीही न करता फक्त मांगल्याचे  कुठले तरी प्रतिक पूजले, त्यासाठी खर्च केला आणि पर्यावरण प्रदूषित केले? या आपल्या आंधळेपणा साठी धन्यवाद?
मी माझ्यापुरतं ठरवून टाकलय! या वर्षी कुठलेच physical प्रतिक पूजणार नाही . 
माझा देव माझ्या आत आहे. कोणतेही काम करताना मी जेंव्हा तल्लीन होते तेंव्हा माझा देव गोड गाणे गुणगुणतो . तीच माझी पूजा असते . काहीच काम नसेल तेंव्हा माझा देव श्वासांच्या तालावर नाचतो आणि मला नवीन कल्पना समजवतो . मी खूप छान माझ्या आवडीचे काहीतरी करत असेल तर मी त्या आतल्या शी connect होते. तीच माझी पूजा असते.  म्हणू देत लोक मला नास्तिक!! 
हळद कुंकू ची पावडर वाहा , घंटी वाजवा, दिवे ओवळा ,टाळ्या वाजवा अशी कर्मकांड करणारी जनता जर आस्तिक असेल तर मी नास्तिक असलेलीच बरी!
मला माझ्या पूजेसाठी काहीही सामान लागत नाही, सणवार लागत नाही, पूर्व पश्चिम दिशा लागत नाही ….! फक्त मीच भानावर असावी लागते! माझा अहंकार पूर्णपणे विझलेला असावा लागतो आणि आतली नव विचारांची ज्योत पेटलेली असावी लागते . माझे विचार सतत बदलत असतात. याची मला खंत वाटत नाहि. उलट या सर्व बदलांचे स्वागत हाच माझा पाडवा असतो ……….! वेडीच आहे मी ! 

No comments:

Post a Comment